मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर इथल्या वाडिया पार्क इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीसयांनी काल इथं दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांनी पटकावली.
अहमदनगर शहरातल्या वाडीया पार्क इथल्या जिल्हा क्रीडा संकुलात छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी फडनवीस बोलत होते.
फडनवीस म्हणाले की, कुस्ती हा आपला प्राचीन खेळ असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या खेळाला राजाश्रय दिला. छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले. पुढील ऑलिंपिक विजेता महाराष्ट्राच्या मातीतूनचं झाला पाहिजे. अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री फडनवीस यांनी यावेळी व्यक्त केली . राज्याचे महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले की, अहमदनगर मध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झालं असून, महाराष्ट्रातून एक हजाराहून अधिक मल्ल या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होत.