नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची सर्वोच्च न्यायलयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पदाचा कार्यभार संपल्यानंतर, म्हणजेच १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे हे शपथ घेणार आहेत. त्यांचा या पदाचा कार्यकाळ सतरा महिण्यांचा असणार आहे.

न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून लवकरच याबाबत औपचारिक अधिसूचना जारी केली जाणार असल्याची  माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.