नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हमाल माथाडी कामगारांना संरक्षण देणारा कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. अहमदनगर  जिल्हा हमाल पंचायतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य हमाल माथाडीमहासंघाच्या राज्स्तस्तरीय द्विवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी हमाल माथाडी मंडळाचे अध्यक्ष  बाबा आढाव होतो. महाराष्ट्राने अनेक कायदे देशाला दिले. हमाल माथाडी कामगार  कायद्यामुळे काबाडकष्ट करणाऱ्या हाताला काम, खिशाला दाम आणि कष्टकऱ्यांना संरक्षण मिळते आहे,  असं सांगून त्यांनी गुंडगिरी दमदाटी आणि इतर  मार्गाचा आधार घेत कष्टकऱ्यांच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप  केला.