नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करांमधला संयुक्त ‘शक्ती सराव’ ३१ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात राजस्थानातल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.

वाळवंटसदृष्य क्षेत्रात दहशतवादाशी कसा लढा द्यावा यावर या संयुक्त सरावात भर दिला जाणार आहे. दोन्ही देशांच्या लष्करामधलं सामंजस्य, परस्पर सहकार्य आणि कार्यान्वय अधिक सुरळीत व्हावं, हा या संयुक्त सरावाचा उद्देश आहे.