नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ८० वर्षांहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे.

प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की पोस्टद्वारे मतदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वांतत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मतदान करता येईल.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं निवडणूक विषयक नियमात ही सुधारणा केली आहे.