मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या काल झालेल्या इडी चौकशीनंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. “महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी” अशीच आमची भूमिका असल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.