नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागांच्या अंतिम वाटाघाटी संदर्भात समाज माध्यम आणि माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.

काही समाज घटकांमार्फत हेतूपरस्पर अशा चुकीच्या पद्धतीनं माहिती पसरवली जात आहे. नागासोबत कोणत्याही वाटाघाटी करण्याआधी आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या सरकारांच आणि हितसंबंधी गटांशी बोलणं केलं जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.