नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्‍यांना केलं आहे.

प्रशासकीय सेवेच्या ९४ व्या ‘आरंभ’ या पायाभरणी अभ्यासक्रमाच्या ४३० प्रशिक्षणार्थिंशी त्यांनी गुजरातमधे केवडिया इथं संवाद साधला.  ‘आरंभ’ पायाभरणी कार्यक्रम हा प्रशासकीय पद्धतीमधे सुयोग्य बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त असल्याचं ते म्हणाले. या सेवेसाठी सरदार पटेल यांनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं मोदी म्हणाले.