नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांखालच्या मुलांना कोविड १९ चा फारसा धोका नसल्याचं पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीच्या वृत्तविभागाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमधल्या रोगप्रतिकारक क्षमतेचा या विषाणूला वेगळ्या प्रकारे हातळत असल्याचं त्यांनी या मुलाखतीत नमूद केलं.
कोविड-१९ लसीकरणानंतर काही जणांमध्ये दिसत असलेले आजार, हे लसीकरणानंतर रोगप्रतिकारक क्षमतेला मिळालेल्या चालनेमुळे होत असल्याचंही प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे. आमच्या श्रोत्यांना डॉ. प्रिया अब्राहम यांची ही मुलाखत आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर आज रात्री सव्वानऊ वाजता ऐकता येईल.