मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण योजनां अंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आलेल्या १लाख ४५हजार ८४९ अर्जांपैकी १ लाख २०हजार १४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून मंडळाकडे अंदाजे रुपये ५१९ कोटींचा अनामत रकमेचा भरणा झाला आहे. अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीनं करण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणाऱ्या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर काल प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुंबई मंडळातर्फे विक्रीकरता जाहीर करण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीचं स्थळ आणि दिनांक मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.