नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येत आहे. ई-पोस्ट ऑफिस सुविधेच्या माध्यमातूनही नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करता येणार आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचं दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे. 2022 मध्ये या मोहिमेला प्रचंड यश मिळालं होतं ज्यामध्ये 23 कोटी कुटुंबांनी त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवला आणि सहा कोटी लोकांनी हर घर तिरंगा वेबसाइटवर सेल्फी अपलोड केले होते.