नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह लवकर भारतात परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल आजपासून सुरू होईल. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून केंद्रिय आंतरराष्ट्रीय आरोग्य विभाग, संबंधित अधिकारी, मृतदेह पाठवणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि विमानवाहतूक कंपन्या यांना मृत्यूसंबंधीची सूचना इमेल, एसएमएस आणि व्हॉटसऍपद्वारे पाठवण्यात येईल. 48 तासांत ही माहिती तपासून अधिकारी मृतदेह भारतात पाठवण्यास मंजूरी देतील असं मांडवीय यांनी सांगितलं.