नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्योजकांनी आपल्या रासायनिक कारखान्यांमधे पर्यावरणपूरक, संवर्धक अशी योग्य ती खबरदारी घ्यायची तयारी दाखवली तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार त्यांना नवउद्यमी स्वातंत्र्य देईल, असं केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत भारतातील रासायनिक उद्योग-पर्यावरणात्मक सुयोग्य व्यवस्थापन या विषयावरच्या आयसीसी शाश्वत परिषद 2019 मधे ते बोलत होते. यंदा दिवाळीत फटाक्यांच्या क्षेत्रात 70 टक्के घट नोंदवली गेली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वयंशिस्त आणि विचारी कृतीचं हे एक आदर्श उदाहरण असल्याचं ते म्हणाले. याबाबतीत त्यांनी खास करुन बच्चे कंपनीला विशेष धन्यवाद दिले.