नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शनिवारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस आणि वकीलांमध्ये झालेल्या चकमकीच्या प्रश्नावरुन दिल्लीतल्या विविध जिल्हा न्यायालयांमधल्या वकीलांनी सुरु केलेलं आंदोलन सलग तिस-या दिवशीही सुरुच राहिलं.

या चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आंदोलक वकील करत आहेत, तर याप्रकरणी संबंधित वकीलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडे करत काल दिल्ली पोलिसांनी आंदोलन केलं. त्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जाईल, असं आश्वासन वरीष्ठ अधिका-यांनी दिल्यानंतर पोलिसांनी हे आंदोलन मागे घेतलं.