मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने ऑगस्ट २०२० मध्ये कृषी उडान योजना सुरू करण्यात आली होती. २०२१ मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला.