नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं स्वागत

भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी स्वागत केलं आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवर म्हटलंय, की या उपक्रमामुळे परस्पर सद्भाव आणि सामंजस्य वाढीला लागेल.

या कॉरिडॉरवर पंजाबमधे डेराबाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्धाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ५०० शीख भाविकांचा पहिला जत्था तिथून कर्तारपूरसाठी रवाना झाला.