नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण भारतात कम्युनिटी रेडिओ सुरु करण्यासाठी मागच्या महिन्याच्या शेवटपर्यंत एकूण ७११ उद्देशीय पत्र वितरित केली आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सभेत एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली.

४१५ अशासकीय संस्थांना,१६३ शैक्षणिक संस्थांना, १२१ सरकारी संस्थांना, आणि अन्य १२ संस्थांना ही पत्र वितरीत करण्यात आली आहेत. ऑक्टोबर पर्यंत २७३ आकाशवाणी वाहिन्या कार्यान्वित झाल्या आहेत, सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर ही पत्रं दिली आहेत.

परवानगी मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत या वाहिन्या सुरु करणं बंधनकारक आहे,असंही त्यांनी सांगितलं.