मुंबई (वृत्तसंस्था) : एफआरपीनुसार उसाचे पैसे एकरकमी द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी  संघटनेनं आज सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं.

वांगी आणि पलुस रोडकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडवले आणि या वाहनांच्या चाकातील हवा सोडली. उदगीर साखर कारखान्याकडे हे ट्रक जात होते, अशी माहिती संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिली.

२३ नोव्हेंबरला संघटना ऊस परिषद भरवणार असून त्यात उस दर जाहीर केल्याशिवाय कारखानदारांनी ऊस तोड करू नये, असा इशारा दिला आहे.