नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती असून देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ इथल्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.