पुणे : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय एकात्मता शपथ
मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/ घेते की, देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन.
मी अशीही प्रतिज्ञा करतो/ करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही. तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय गाऱ्हाणी शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.