नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर सरकारचा कारभार चालवण्यासाठी या केंद्रशासित प्रदेशानं नायब राज्यपाल जी सी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय परिषद स्थापन केली आहे. मुख्य सचिव या प्रशासकीय परिषदेचे सचिव म्हणून काम पाहतील.
नायब राज्यपालांच्या दोन सल्लागारांपैकी के के शर्मा यांच्याकडे पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, नियोजन-विकास आणि देखरेख, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, आणि उद्योग या खात्यांचा कार्यभार दिला आहे. तर, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, प्रशासकीय सुधारणा आणि प्रशिक्षण, सहकार, फुलशेती, निवडणूक, कामगार आणि रोजगार, हज आणि औकाफ, समाज कल्याण, युवक आणि क्रीडा ही खाती फारुख खान यांच्याकडे सोपवली आहेत.