नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरण्यायोग्य प्लॉस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी, अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी केली.

शून्य प्रहरात, अशा प्लॉस्टिकच्या दुष्परिणामांबाबत अनेक सदस्यांनी काळजी व्यक्त केली, तेव्हा सभापतींनी ही सूचना केली. या प्रश्नावर सभागृहात सामुहिक निर्णय झाला, तर त्याचा लाभ देशातल्या 130 कोटी लोकांना होईल, असं ते म्हणाले. त्यांच्या या सूचनेचं स्वागत करत सदस्यांनी पाठिंबा व्यक्त् केला.