नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्न, तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के राजेश म्हणाले की, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरं निर्बंध घातले जात आहेत.

निर्दशनं करणाऱ्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. जेएनयू परिसरात विवेकानंदाच्या पुतळ्याची विठंबना झाल्याचा मुद्दा भाजपाचे प्रभात झा यांनी उपस्थित केला. दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न भाजपाचे विजय गोयल यांनी उपस्थित केला.

पाणीप्रदूषण, वायूप्रदूषण हे चिंतेचे मुद्ये आहेत. शहरातल्या सुमारे 2 कोटी नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावं लागत आहे, असं ते म्हणाले. सदस्यांनी सभागृहात प्रदूषणविरोधी मास्क आणि पाण्याच्या बाटल्याचं प्रदर्शन करू नये, असं आवाहन अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी केलं. सर्व सदस्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे, असं ते म्हणाले.