नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे अर्थ आणि नवे विकास मंत्रालय असून, दिनेश गुणवर्धने परराष्ट्रमंत्री आहेत.

राजपक्षे कुटुंबातले सर्वात मोठे बंधू चमल राजपक्षे यांच्याकडे कृषी आणि ग्रामीणविकास मंत्रालयाचा कार्यभार दिला आहे. अल्पसंख्याक तामिळ समुदायातले दोन मंत्री या मंत्रीमंडळात आहेत. मात्र फक्त् एकाच महिलेला या मंत्रीमंडळात स्थान मिळालं आहे.