मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. अजित पवार यांची पक्षाच्या गडनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्टवादी काँग्राच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला हजर झाले.
आपली निष्ठा, पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचं त्यांनी सांगितलं. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे यांनी शपथविधी कार्यक्रमाबाबत आपल्याला अंधारात ठेवलं होतं, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
राजेंद्र शिंगणे, संदीप क्षिरसागर, सुनील शेळके, सुनील भुसारा, नरहरी झिरवळ आणि सुनील टिंगरे हे देखील बैठकीला हजर आहेत. पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे देखील बैठकीला पोहचले.