मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडीं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नाशिकमधल्या कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या कुटुंबीयांनीही, ते बेपत्ता असल्याची तक्रार नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे, तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंबियांनीही ते बेपत्ता असल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात केली आहे