मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्ष झाली. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ ला पाकिस्तानातल्या लष्कर ऐ तयब्बा या दहशतवादी संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात १८ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या २ कमांडोज सह १६६ जणांना प्राण गमवावे लागले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली. या दहशतवादी हल्ल्यासारखी कुठलीही स्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सुसज्ज आहेत,  असं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितलं.