पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत 250 क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतीगृह पिंपरी चिंचवड मोशी प्राधिकरण सेक्टर-4 स्पाईनरोड पथ क्र.8 संतनगर ज्ञानेश्वर हॉस्पिटल शेजारी मोशी प्राधिकरण -412105 येथे सप 2019 -20 करीता अनु.जाती (SC) अनु.जमाती (ST) विजाभज (VJNT) एसबीसी (DBC)ईबीसी (EBC)अपंग (HANDICAP)अनाथ (ORPHAN) इत्यादी प्रवर्गाच्या विद्यार्थींनीना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया चालू आहे. बाहेरगावाकडील परंतु पुणे पिंपरी- चिंचवड मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरु विद्यार्थींनींना फॉर्म भरण्या करीता वसतिगृहात येऊन नोंद करुन घेऊन जावे असे या कार्यालय मार्फत आवाहन करण्यात येत आहे. असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष साहय विभाग, 250 क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड यांचे कार्यालय, सेक्टर- 4 स्पाईनरोड पथ क्रमांक 8, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल मागे, स्पाईनरोड मोशी, प्राधिकरण 412105 येथे संपर्क साधावा असे शाळेचे गृहप्रमुख यांनी कळविले आहे.