मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी साडे सहा वाजता शिवाजी पार्कला होणार असल्याचं जाहीर केलं. तसं पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.