नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्‍यांना बाहेर काढलं.  सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले.

मात्र शेकडो आंदोलकांनी दूतावासाला वेढा घातला आणि अनेक वस्तू पेटवल्या. या महिन्याच्या सुरुवातीला करबला शहरातल्या इराणी दूतावासावर देखील आंदोलकांनी हल्ला चढ्वला होता त्यावेळी ४ आंदोलक ठार झाले होते. सरकारविरोधी आंदोलनात आतापर्यंत ३०० जणांहून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.