नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेसाठीचा संघ, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल जाहीर केला.सलामीवीर शिखर धवनला गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून वगळलं आहे.

धवन ऐवजी संजू सॅमसन याचा संघात समावेश केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना 6 डिसेंबरला हैदराबादला, 8 डिसेंबरला दुसरा सामना तिरुवनंतपुरम इथं तर तिसरा सामना 11 डिसेंबरला मुंबईत होणार आहे.