मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली, आणि त्यांचं अभिनंदन केलं.
आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील  सरकार मागासवर्गीय आदिवासी गोरगरिबांचे  प्रश्न प्राधान्यानं  सोडवतील अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  स्मारकाच्या  कामाला  गती द्यावी आणि  ते काम लवकर पूर्ण करून घ्यावं अशी विनंती त्यांनी ठाकरे यांना केली.