नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांवर पथकर वसुलीसाठी ‘ फास्ट टॅग ‘ जोडण्यासाठी केंद्र सरकारनं १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. येत्या १ डिसेंबरपासून ‘ फास्ट टॅग ‘ द्वारे पथकर वसुली केली जाईल अशी घोषणा यापूर्वी केंद्र सरकारनं केली होती. बहुतांश वाहनं फास्ट टॅगशी जोडलेली नाहीत त्यामुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.
इंधन आणि वेळ वाचवण्यासाठी तसंच वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं इलेकट्रॉनिक पथकर वसुली कार्यक्रम सुरु केला आहे. माय फास्ट टॅग एप सुरु करण्यात आलं असून त्यावर यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे.