नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तिरुवल्लुर, थूथुकुडी आणि रामनाथपुरम् जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

चेंगलपट्टू, कांचीपुरम्, कुड्डालोर आणि चेन्नई इथल्या शाळाही बंद असतील. पुदुच्चेरीमधल्या सर्व शाळा आज बंद राहतील. तामिळनाडूतल्या मद्रास विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठानं आजच्या परिक्षा पुढे ढकल्या आहेत. चेन्नईच्या अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. रामेश्वरम इथं गेले दोन दिवस सतत कोसळत अशलेल्या पावसामुळे विविध भागात पाणी भरलं आहे.

हवामान खात्यानं मच्छिमाराना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. चेन्नई महापालिकेसह सर्व जिल्हा मुख्यालयांच्या माध्यमातून मदत कार्यासाठी १०१ क्रमांकाची सेवा उपलब्ध आहे.