मुंबई : दहावी बोर्डाचा निकाल ८ जुनला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्रात दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी २०१८ मध्ये दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल ८ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदाच्या वर्षीदेखील हीच तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर भेट द्या.