नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि मुद्रांक शुल्कात १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आमच्या वार्ताहारानं दिलेल्या माहितीनुसार अशा इच्छूक उद्योग समुहांना राज्य सरकारमार्फत वीजपुरवठा, रस्ता, आणि संपूर्ण जागेला कुंपण घालून दिलं जाणार आहे. नोयडा आणि ग्रेटर नोयडा इथं न्यायालयीन प्रक्रियेमुळे गृहप्रकल्प पूर्ण न करू शकणाऱ्या विकासकांना दंडाची रक्कम माफ करण्यात आली आहे.
त्यामुळे हे गृहप्रकल्प लवकर पूर्ण होऊन सामान्य गृह खरेदीदाराला दिलासा मिळणार आहे. गृह खरेदीदारांना हा लाभ पोचवणाऱ्या विकासकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे जवळपास १ लाख नव्या घरांची निर्मिती होण्याची अपेक्षा राज्य सरकारला आहे.