नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
पक्षांच्या नोंदणीसाठी १ जानेवारी २०२० पासून अर्ज करणाऱ्या अर्जदाराला आपल्या अर्जाच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येईल आणि त्याची ताजी माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे कळवली जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.