नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं आहे. मुख्य वनसंरक्षक पवन कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव कल्पना अवस्थी, आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक जी.एल. मीना, अशी या तीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.
सोनभद्रा इथली वन विभागाची जमीन अवैधरित्या एका उद्योग समूहाला हस्तांतरित केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे पवन कुमार आणि कल्पना अवस्थी यांना निलंबित केलं आहे, तर मीना यांना वेतन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित केलं आहे. कारागृह महासंचालक आनंद कुमार यांना गृहरक्षक दलाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.