नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान बरोबर १९७१ साली झालेल्या युद्धात नौदलानं बजावलेल्या अतुलनीय कामगिरीच्या स्मरणार्थ आज नौदल दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे.

१९७१ साली भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला करून पश्चिम किनारपट्टीवरून पाकिस्तानी फौजांना पिटाळलं होतं.

भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नौदल बजावत असलेली भूमिका आणि त्यांचं यश आजच्या दिवशी विविध पद्धतीनं विविध ठिकाणी साजरं केलं जातं.