नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी महाविद्यालय अशा विविध गटांसाठी देण्यात आलं.

स्वच्छतेच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यात विद्यार्थी महत्त्वाचं योगदान देत आहेत, असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यावेळी सांगितलं.

या मानांकनासाठी विद्यार्थी-प्रसाधनगृह गुणोत्तर तसंच वसतीगृह, स्वयंपाकगृह इथली स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, जलसंचयाच्या उपाययोजना, परिसरातली हिरवाई तसंच यासंदर्भातल्या प्रशासकीय जबाबदा-यांच वाटप असे विविध निकष ठरवण्यात आले होते, असंही त्यांनी सांगितलं.