नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं. अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली.
व्हॉलीबॉलमधे भारतीय पुरुष संघानं आणि ३-१ असा पराभव केला. तर भारतीय महिलांसघानं नेपाळला चुरशीच्या लढतीत ३-२ असं हरवून सुवर्ण पदकं जिंकली. नेमबाजीमधे दहा मीटर एअर रायफल गटात भारताच्या मेहुली घोषनं सुवर्ण पदक पटकावलं.
रौप्य आणि कांस्य पदकही जिंकलं. भारतीय महिलांना सांघिक सुवर्ण पदकही मिळालं. टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी अनुक्रमे नेपाळ आणि श्रीलंकेचा पराभव करुन दोन सुवर्ण पदकं पटकावली.