नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपलं सरकार योग्य दिशा, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचा यथायोग्य उपयोग याच्यासाहाय्याने देशातल्या 130 कोटी जनतेच्या उज्जवल भाविष्याची पायाभरणी करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते नवी दिल्लीत हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषदेत बोलत होते.
अनेक दशकांपासून असलेली आव्हानं मोडून काढण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले. उत्तम व्यवस्थापन ही काळाची गरज असून, नागरिकांच्या वैयक्तिक जीवनात सरकारचा किमान हस्तक्षेपही व्यवस्थापनाची गुरुकिल्ली असल्याचंही त्यांनी म्हटलं. देशभरातले ११२ जिल्हे हे विकासक्षम जिल्हे म्हणून निवडले असून त्यांच्याबाबतीत व्यवस्थापन विकासाच्या प्रत्येक घटकाची नोंद ठेवली जाईल.
जम्मू कश्मीरमधल्या ३७०-कलमाबाबतचा निर्णय हा राजकीय दृष्ट्या धोकादायक असला तरी, त्या राज्यातल्या नागरिकांना विकासाचे नवे आयाम देणारा आहे, असंही ते म्हणाले.