नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्‍या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो.

सशस्त्र दलातील सैनिकांच्या कल्याणासाठी या दिवशी नागरिकांकडून निधी गोळा केला जातो. या दिवसानिमित्तानं गोळा केलेला निधी ‘आजी माजी’ सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो.