नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त ठरणा-या इंटिग्रेटेड कमांड एण्ड कंट्रोल सेंटर अर्थात, एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राचं उद्धाटन हरियाणात गुरुगारम इथं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री राव इंद्रजितसिंग यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, लवचिक वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट पार्किंग, पाणी पुरवठा आणि व्यवस्थापन, प्रदूषण, निरिक्षण आणि नियमन, मालमत्ता कर भरणं, तसंच मालमत्ता व्यवस्थापन अशा विविध सेवा सुविधांमधे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या केंद्राच्या उभारणीला 38 कोटी रुपये खर्च आला आहे.