नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं या व्यापा-यात आपला दबदबा कायम ठेवल्याचं म्हटलं आहे.

१०० मोठ्या शस्त्र निर्मिती करणा-या कंपन्यांची उलाढाल ४२० अब्ज डॉलरवर गेली असून या बाजारातला एकट्या अमेरिकेचा वाटा हा ५९ टक्के आहे.