मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या आहेत. ते मुंबईत पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पोलीस अधिका-यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पोलीस आयुक्तसंजय बर्वे उपस्थित होते. ठाकरे यांनी आयुक्तालयातल्या २४ तास कार्यरत असणा-या नियंत्रण कक्षाची पाहणी केली. या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी पोलीस अधिका-यांना दिल्या आहेत.