नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात काल आयोजित एकदिवसीय ‘राष्ट्रीय लोकअदालत’ उपक्रमात जवळपास ७ हजार ७०० प्रकरणं निकाली काढण्यात आली.

दोन्ही प्रदेशात विविध ठिकाणी आयोजित १२८ खंडपीठात एकूण ११ हजार ४६१ प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी तसंच कामगार विषयक प्रकरणांचा समावेश होता.