नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे.

यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च ध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी काल बातमीदारांना दिली. यांपैकी ९ लाख ७५ हजार ८९४ मुलं, तर ७ लाख ८९ हजार ८९४ मुली असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यभरातल्या एकूण ४ हजार ९७९ केंद्रांवर ही परीक्षा होईल. परीक्षा सुरळीत आणि कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडाव्यात यासाठी महिलांच्या विशेष पथकांसह, २७३ भरारी पथकं नियुक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या २३ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरु राहील.