मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे इतर पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

ते मुंबईत मेट्रो-३ प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदान इथून भुयारी मार्गानं प्रवास करत काळबादेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भुयारी मार्गाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.