नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायु दलाच्या वेगवेगळ्या शाखांच्या प्रशिक्षणार्थींचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षणपूर्ण झाल्याच्या निमीत्तानं, आज तेलंगणातल्या दुंडीगल वायुदल प्रशिक्षण अकादमीत संयुक्त संचलन झालं.

एअर चीफ मार्शन आर.के.एस. भदौरिया या संचलानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भदौरिया यांनी यशस्वीपणे प्रशिक्षणपूर्ण केलेल्या २३ महिलांसह १२७ पदवीधारकांना राष्ट्रपती नियुक्तीपत्र प्रदान केलं.

सर्व उमेदवारांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी तसंच कोणत्याही युद्धासाठी सज्ज राहावं, असं आवाहनही भदौरिया यांनी यावेळी केलं.